उस्मानाबाद, दि. 10 : जिल्हयात सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी 183 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात तिघांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हयात एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 644 वर गेली असून यातील 973 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यात 25, तुळजापूर 24, उमरगा 48, कळंब 96, परंडा 14, लोहारा 15, भूम 38, वाशी तालुक्यातील 7 जणांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 475 स्वब पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे तसेच जिल्हयातील रॅपिड अॅटिजेन चाचणीचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.




