नळदुर्ग, दि. 10 : शहरातील विविध ठिकाणी विजेचे पोल उभे केले आहेत. ते उभे करीत असताना त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट केले नाही. यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेता पोल सीमेंट कॉन्क्रीट करून उभे करावेत अशी मनसेनी महावितरण कार्यायलयाला सूचना केली होती. मात्र  त्याकडे दुर्लक्ष करून महावितरण बेजबाबदारपणे हे सर्व पोल तसेच उभे केले आहेत. म्हणून हे पोल सिमंमेंट कॉन्क्रीट करून मजबूत करावे. तसेच कोरोनाच्या पाश्वभूमीवर मार्च महिन्यापासुन लॉकडाउन होते, अशा परिस्थितीत सर्वसामान्यावर आर्थिक दृष्टया मोठा परिणाम झाला आहे. अशावेळेस विजेचे तीन-चार महिन्याचे बिल एकदम आले आहे. तरी त्या ग्राहकाना विज बील भरण्यासाठी हप्ते पाडुन द्यावेत व विजबिल भरण्याअभावी त्यांचे कनेक्शन तोड़ू नयेत अन्यथा नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख़, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे आदीजण उपस्थित होते.

 
Top