उस्मानाबाद : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यातील मनुगुती गावातील स्मारक प्रशासनाने हटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. शिव छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधी ही सहन करणार नाही.या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून कर्नाटक सरकारने माफीनामा जाहीर करावा, व त्याच ठिकाणी सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे करावे, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष कुणाल महाजन यांच्या नेतृत्वखालील जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आले.

या वेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राहुल बाचाटे, विद्यार्थी सेना जिल्हाउपाध्यक्ष सौरभ देशमुख, सचिव आदित्य लागदिवे, धीरज खोत,मोहित पांढरे, प्रथमेश जाधव, आकाश वडजे, बिट्टू लाकाळ, सुहास इंगळे, विवेक यादव, अभिषेक चौरे गणेश यादव आदीजण  उपस्थित होते.

 
Top