अणदूर, दि. 10 : अणदूर ता.तुळजापूर या गावात सोमवार दि.१० आँगस्ट रोजी झाडावरुन पडुन मृत्युमुखी पडलेल्या वानराची अत्यंविधी करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथिल पुजारी गल्ली परिसरात अनेक दिवसांपासून दोन माकडे वावरताना दिसत होती. ही दोन्ही माकडे कोणत्याही प्रकारचा त्रास देत नसल्याने गावातील सर्वांना ती आवडायची. माकडाचा वावर गावातील पुजारी गल्ली परिसरात अधिक असल्याने अनेकांनी त्यांच्या वरती जीव लावला होता व त्यांची सवय सर्वाना झाली होती. सोमवारी सकाळी एक माकड मृत पडलेले दिसले गल्लीतील युवकांनी याची माहिती तुळजापूर तालुका वनरक्षक सतीश साळुंखे,राहूल शिंदे यांना दिली. शिवाजी पवार,तुकाराम मिचळ या दोन वनमजुरानी गावातील भागवत स्वामी,गजानन मोकाशे, मकरंद भालकरे आदी पुजारी गल्लीतील युवकांनी एकत्रित मारुती मंदिराच्या शेजारी त्याच्या वरती अंत्यसंस्कार करण्यात आले.

