तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर भारतीय जनता पार्टी, रिपाइं (आ), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुती तुळजापूर तालुक्याच्या वतीने शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. दुध दरवाढ झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे विज बील माफ झाले पाहिजे या साठी या सरकारला सद् बुद्धी येवु दे!, या राज्य सरकारला जाग येवो म्हणून श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वार समोर जागरण गोधंळ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलना दरम्यान तुळजापुर तालुक्याचे भाजपा आमदार राणाजगाजितसिंह पाटील बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारकडे जीएसटीच्या माध्यमातुन या राज्य शासनाला २० हजार कोटी रुपये दिले आहेत. माञ हे सरकार कोवीड १९ च्या ब्रँन्डीमेन च्या काळा मध्ये राज्य सरकार आपणास मदत करीत नाही म्हणून सरकारला जाग यावी व मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना सद् बुद्धी देवो या साठी भाजपाच्यावतीने जागरण गोधंळच्या माध्यमातून श्री आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात प्रार्थना केली आहे. तसेच अडचणीत आलेल्या दुध उत्पादकांना या सरकारने तातडीने मदत द्यावी, या राज्य सरकार कडे पैसे भरपूर आहेत. केंद्र सरकारने तरदुत केली आहे. अजुन दिड लाख कोटी एवढ कर्ज या सरकारला घेणं शक्य आहे. पैसा उपलब्ध आहे. परंतु मदत करण्याची इच्छा होत नाही. या दुध उत्पादकाना प्रति लिटर १० रुपये दर वाढ मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ झाले पाहिजे तसेच अडचणीत असलेल्या सामान्य गोर गरीबांना या सरकार कडुन मदत करण्याची श्री आई तुळजाभवानी सद् बुध्दी देवो असे साकडे घालण्यात आले.
यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अनिल काळे, तुळजापुर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, विशाल रोचकरी, आनंद कदंले, नागेश नाईक, शिवाजी बोधले, सचिन रसाळ, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नारायण नन्नवरे, विक्रम देशमुख, विकास मलबा, गुलचंद व्यवहारे, प्रभाकर मुळे, भाजपा युवा मोर्चाचे दिनेश बागल, भाजपाच्या महिला आघाडीच्या मिना सोमाजी, भाजपा मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खुरुद, नगरसेवक अभिजित कदम, बाळासाहेब शामराज, सुहास सांळुके, बाळासाहेब भोसले, इंद्रजीत सांळुके, उमेश गवते, श्रीकांत हिराळकर, सागर कदम, गिरीष देवळालकर आदीसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.