मुंबई, दि. 01 :
दि. 7 सप्टेंबर रोजी होणा-या विधीमंडळ अधिवेशनात राज्य सरकारने हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न देण्यासाठी बहुमताने ठराव पास करुन केंद्र सरकारकडे पाठवावे, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा मिशनच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सलग 12 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळणारे आणि एका वर्षात महाराष्ट्र अन्न धान्याने स्वयंपूर्ण करेल अथवा फासा वर जाईल, असे 'विकासाचे महामेरु, पंचायत राज योजना, कापूस एकअधिकार योजना , हायब्रीड ज्वारी निर्माण करुण दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करणा-या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी राज्य सरकारने ठराव घेवून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.