नळदुर्ग, दि. 01 : शहरातील बसवेश्वर चौकात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून या ठिकाणी गरजू लोकांना शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्यावतीने किट, आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या व पाण्याचे जार यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संजय जाधव यांनी यापूर्वी लॉकडाऊन काळात किराणा किटचे वाटप हे स्वखर्चाने केले होते. आताही प्रतिबंधित क्षेत्रात त्यांनी गरजू लोकांना याचे वाटप केले आहे. सामाजिक बांधिलकी असलेल्या जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, जेष्ठ नागरिक मल्लिनाथ माळगे, नगरसेवक विनायक अहंकारी, माजी नगरसेवक संजय बताले, माजी नगरसेवक सुधीर हजारे, भाजप शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, श्रमिक पोतदार सुनिल गव्हाणे, धिमाजी घुगे, उमेश जाधव, नवल जाधव, गणेश मोरडे, महेंद्र डुकरे, राजू महाबोले, न.प. कर्मचारी काकडे, बचाटे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, अमर भाळे, मारुती खारवे, लतीफ शेख यांच्या उपस्थितीत या किराणा किट आर्सेनिक अल्बम आणि पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.