मुंबई, दि. 01 : महाराष्ट्र सरकारने कित्येक वर्षापूर्वी पासुन राज्य मागासवर्ग आयोग निर्माण केला आहे. मागासवर्ग आयोगची मुदन जानेवारी 20 ला संपली आहे, तर आयोगाचे अध्यक्ष म्हंसे यांचे निधन झाले असून त्यांच्या जागी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मागास वर्ग आयोग ओबीसी, व्हीजे, एसबीसी, एनटी, एसईबीसी करीता आहे. आयोगावर विमुक्त जातीचा प्रतिनिधी घेतला जातो. परंतु सदर आयोगाने आज पर्यंत बंजारा समाजाला ना प्रतिनिधित्व दिले, ना बंजारा समाज करीता आयोगाने कोणतेही ठोस निर्णय घेतले. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगावर बंजारा समाजाला प्रतिनिधीत्वं द्यावे अन्यथा नाइलाजने न्यायलयाचे दरवाजे खटखटावे लागेल, असे राष्ट्रीय बंजारा मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड़ यांनी एका पत्रकात नमूद केले आहे.