तुळजापुर, दि. 01 : येथील सुशीलाबाई आबाराव जटाळ वय वर्षे ७० रा.तुळजापुर यांचे शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर येथील घाटशीळ रोडवरील स्मशान भुमीत दुपारी १ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.