काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त 100 वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रारंभी केमवाडीच्या सरपंच सौ. छाया मारुती डोलारे यांच्या हस्ते लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. छाया मारुती डोलारे, राजेंद्र डोलारे, गौरीशंकर नकाते, शाखाध्यक्ष संतोष डोलारे,उपाध्यक्ष पवन डोलारे,नागेश डोलारे,सचिव तात्यासाहेब गायकवाड, कार्याध्यक्ष जनार्दन डोलारे, कोषाध्यक्ष सर्जेराव डोलारे, नितीन डोलारे, खजिनदार नवनाथ डोलारे,सागर गायकवाड, प्रशांत डोलारे, पांडुरंग डोलारे, शत्रुघ्न डोलारे, रघुनाथ डोलारे, संजय डोलारे, लखन डोलारे, राजेंद्र प्र. डोलारे आदी मान्यवरांसह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.