उमरगा, दि. 01 : उमरगा तालुक्यातील मौजे तुरोरी या गावात कोविड- 19 संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहेत. त्या क्षेत्रातून विनाकारण ये-जा करण्यास मनाई आहे. असे असतांनाही 1) महेश कराळे 2) योगेश कराळे 3) अजय घोडके 4) रविंद्र धानोरे असे चौंघे दि. 01.08.2020 रोजी सकाळी 08.30 वा. सु. या प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर विनाकारण पडले. यावरुन पोकॉ- चंद्रकांत फडतरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.