तुळजापूर : कुमार नाईकवाडी

अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन सोहळा साठी शुभेच्छा येताना संस्कारभारतीच्या कलाकारांनी तुळजापुरात ठिकाणी नेत्रदीपक रांगोळ्या काढल्या होत्या त्यानंतर राम मंदिर आणि तुळजाभवानी महाद्वार येथे सामुदायिक आरती करण्यात आली याप्रसंगी सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले होते.



तुळजापूर संस्कार भारतीच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सर्व रांगोळी कलाकारांनी हनुमान मंदिर राम मंदिर आणि श्री तुळजाभवानी मंदिर, सुवर्णश्वर गणपती मंदिर, पावणारा गणपती मंदिर, छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी रांगोळ्या रेखाटन करण्यात आल्या.

यामुळे शहरात संपन्न झालेल्या आनंद उत्सवामध्ये आपल्या रांगोळी मुळे सर्वत्र प्रसन्न आणि मंगलमय वातावरण निर्माण होण्यास मदत झाली संस्कारभारतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी केलेले पूर्वनियोजन आणि नियोजनाप्रमाणे केलेले काम दिसून आले.
 
Top