अणदूर, दि. 06 : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे विश्व हिंदू परिषदच्यावतीने रामजन्मभूमी मंदीर भूमिपूजनाच्या पार्श्र्वभूमीवर प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच प्रसाद म्हणून 1100 लाडुचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटातून मुक्ती मिळो, अशी प्रार्थना साकडे यावेळी प्रभू श्रीराम चरणी करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नागनाथ बोंगरगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामप्पा खजुरे, संगमेश्वर पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा समिती सदस्य केदारनाथ पाटील, निसर्ग सालेगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.