काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे बुधवार दि.(5) रोजी येथील बसस्थानक शेजारील भाजप कार्यालयात आपल्या सर्वांचा आस्थेचा आणि श्रध्देचा परमेश्वर अयोध्येतील प्रभुरामचंद्र यांच्या रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचा प्रभुश्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन, दिप प्रज्वलित करून, पेढे व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  

रामजन्मभूमी मंदीर  भूमिपूजनाच्या पार्श्र्वभूमीवर सावरगाव येथे धार्मिक व भक्तीमय वातावरणात येथील  ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाच्या वतीने बसस्थानक शेजारील भाजप कार्यालयात भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,व प्रथम नागरिक सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते श्रीरामाच्या जयघोषात  श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन, भाजप कार्यालयासमोर ध्वजारोहण आणि दिप प्रज्वलित करून तसेच पेढे व लाडू वाटून अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मंदीर भूमिपूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यामुळे सावरगाव येथील बसस्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी सरपंच, चेअरमन विनायक करंडे, नेताजी कदम,जगु काडगावकर ,बाळासाहेब डोके,काशिनाथ माळी, शिवाजी कुंभार, रणजीत भालेकर,श्रीधर पाटील, धमु रुपनर,सुरेश रुपनर,नटराज शिंपले,अनिल पाटील, श्रीधर मारडकर, अशोक डोके, मारुती डोके आदीजण उपस्थित होते.
 
Top