उस्मानाबाद : शहरातील आदर्शनगर मधील सौ. सुनंदा अभिमान हंगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूक्मिणी फाऊंडेशन तर्फे माणूसकीचे मंदिर कुष्टधाम मधील कुष्ट रूग्णांना माणूसकीच्या भावनेतून मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून प्रा.अभिमान हंगरकर व कुटुंबियांनी कुष्ट रूग्णांना मिठाई वाटप करून सौ.सुनंदा अभिमान हंगरकर यांचा वाढदिवस साजरा करूण माणूसकीचे दर्शन घडविले.या प्रसंगी प्रा.अभिमान हंगरकर,सौ.सुनंदा हंगरकर,श्वेता हंगरकर व कुटुंबिय उपस्थित होते.