मुरूम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालायतील प्राणीशास्त्र विभागात गेल्या २३ वर्षापासून कार्यरत असणारे प्रा.डॉ.चंद्रकांत जावळे यांची देवणी, ता.देवणी येथील कै.रसिका महाविद्यालयात प्राचार्य पदी निवड होऊन नुकतेच ते तेथे रुजूही झाले आहेत.
त्यांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय विविध परिषदामध्ये शोधनिबंधाचे वाचन व नामवंत शोधपत्रिकेमध्ये पन्नासच्यावर संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. त्यांनी नेपाळ, श्रीलंका व थायलंड देशातील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन संशोधन पेपरचे वाचन केले होते. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थांकडून राष्ट्रीय फेलोशिप अँवार्डने सन्मानित करण्यात आले होते.
सध्या ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्ल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राजकुमार रोहीकर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.किरण राजपूत, डॉ.संध्या डांगे, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रविण गायकवाड, उपप्राचार्य सुधीर अंबर, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, काकासाहेब पाटील आदिंनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.