काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर पंचायत समितीच्या उपसभापती शिवाजी गोरे यांची बिनविरोध करण्यात आली आहे. 

दि. 4 ऑगस्ट रोजी रोजी पंचायत समिती सभागृह तुळजापूर येथे पीठासीन अधिकारी तथा नायब तहसीलदार व बीडीओ तुळजापूर यांच्या उपस्थितीत उपसभापती  निवडीकरिता बैठक झाली. यामध्ये शिवाजी गोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.


यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या उपस्थितीत शिवाजी गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंटू मुळे, नेताजी पाटील, रामचंद्र पाटील, विजय शिंगाडे, राजकुमार पाटील, नारायण नंनवरे, बापू कणे, दत्ता शिंदे, अण्णा सरडे, वसंत वडगावे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top