काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा पत्रकार प्रा. अभिमान हंगरकर यांचा रानफुल साहित्य व्यासपीठ, यु ट्युब चॅनल आयोजित ऑनलाईन रानफुल श्रावण काव्यधारा या कार्यक्रमात गौरवपत्र देवुन मान्यवरांनी सन्मानित केले.
सोमवार दि.3 रोजी सकाळी रानफूल साहित्य व्यासपीठ/यु ट्युब चॅनल आयोजित ऑन लाईन रानफूल श्रावण काव्यधारा या कार्यक्रमात 40 कवी सहभागी झाले होते .या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाल्याबध्दल प्रा.अभिमान हंगरकर यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनिता देशमुख, प्रमुख उपस्थिती महादेव आवारे, प्रमुख पाहुणे सविता इंगळे पुणे, उदघाटक कांचन वीर यु एस ए, कार्यक्रमाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील हे होते. तर रानफूल संस्थापक हरिश्चंद्र खेंदाड,मदन देगांवकर, अशोक खडके, शांता सलगर यांनी नियोजन केले होते. तर निवेदन हणमंत पडवळ, तन्वी खडके, मंदाकिनी नेमाने संजय भालेराव यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनिषा क्षीरसागर मानले.