काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रा.शा.काटी मुख्याध्यापक एस.एम. संगमनेरकर यांची  जिल्हा परिषद उस्मानाबाद प्रशासनाने शिक्षकांमधून परंडा येथे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 2 पदी पदोन्नती दिली आहे.

 जिल्हा परिषद प्रशासन मा.मु.का.अ.व शिक्षण अधिकारी (प्रा.) मा.रोहिणी कुंभार यांनी मंगळवारी मुख्याध्यापक शिक्षकांमधून ११ जणांची शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 2 व श्रेणी ३ पदी व 29 जणांचे मुख्याध्यापकपदी  पदोन्नतीचे आदेश काढले.

पदोन्नती मिळालेल्यांमध्ये तुळजापूर तालुक्यातील  काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रा.शाळेचे मुख्याध्यापक एस.एम. संगमनेरकर यांचा समावेश असून त्यांना परंडा येथे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 2 म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
 
Top