उमरगा : लक्ष्मण पवार
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने नात्यामध्ये दुरावे झाले पण रक्षाबंधन भावाच बहीणीच एक अतुट नात लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सुधीर व संदिप चंदनशिवे यांनी कानेगाव येथे राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिनीला बहीणीला राखी बांधल्यानंतर सॅनिटायजरची ओवाळणी केली. राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीने व भावाने दोघानी पण हात सॅनिटायजरने धुवून , मास्क बांधून राखी बांधली .
रक्षाबंधन हा भाऊ व बहिणीचा पवित्र सन आहे . प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असते . राखी बांधल्यानंतर प्रत्येक भाऊ बहिणीला काही ना काही भेट देत असतो . बहिणीच्या संरक्षणासाठी भाऊ नेहमी तत्पर राहतात . उमरगा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात व दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहून लोहारा तालुक्यातील सुधिर व संदिप चंदनशिवे या दोघा भावांनी उमरगा येथून राखी बांधण्यासाठी आलेल्या सरोजा भोसले या आपल्या बहिणीचा व कुटूंबाचा कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून सॅनिटायजरची ओवाळणी म्हणून भेट दिली आहे .