उमरगा : लक्ष्मण पवार
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या राज्यातील प्रमुख सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची निवड सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यामध्ये उमरगा येथील आकाश जाधवर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
वंजारी सेवा संघाचे संस्थापक राहुल जाधवर,प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गीते, महासचिव बाजी दराडे,कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे,उपाध्यक्ष अमोल कुटे, युवा आघाडीचे राज्य प्रमुख प्रकाश आव्हाड, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख डॉ.मंजुषाताई दराडे,कार्याध्यक्षा सौ.सविताताई मुंढे, विकास जाधवर , नितिन सांगळे , अशोक घोळवे , रणजित जाधवर प्रदेश संपर्क प्रमुख प्रा गुणवंत जाधवर यांनी सर्वानुमते ही निवड केली आहे.
या मध्ये जिल्हाध्यक्ष पदी विशाल जाधवर (वडजी), जिल्हा सरचिटणीस बापूराव बांगर (बांगरवाडी) ,जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधवर (कळंब),जिल्हा उपाध्यक्ष संतोष सांगळे (बोरगाव ), जिल्हा कोषाध्यक्ष अमोल मुंडे (उस्मानाबाद), जिल्हा सहसचिव धनंजय जाधवर (रत्नापुर), जिल्हा संपर्क प्रमुख संग्राम मुंडे (गोविंदपूर), ऍड प्रशांत सोनवणे (तुळजापूर),जिल्हा सहसंपर्कप्रमुख विठ्ठल मुंडे (उपळाई), जिल्हा चिटणीस प्रा बालाजी खोगरे(ईडा), रोहित मुंडे(उपळाई), जिल्हा संघटक गोविंद मुंडे (दुधळवाडी),अनंत तिडके (कळंब), जिल्हा सहसंघटक अजित घुगे (हगलूर), जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुसेन घोळवे (सोनारवाडी),यांचा समावेश आहे.
राष्ट्रसंत श्री भगवानबाबा, संतश्रेष्ठ श्री वामनभाऊ, संत श्री आवजीनाथ महाराज, लोकनेते गोपीनाथ मुंडे या सर्वांचे आशीर्वाद घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यात समाज सेवेचे कार्य करणार असल्याचे आकाश जाधवर यांनी सांगितले. या निवडीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील वंजारी बांधवानी अभिनंदन केले.