उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा शहरातील डॉ. वाघमोडे यांच्या संत गजानन हॉस्पिटल मध्ये प्रायव्हेट कोविड सेंटरचे 40 बेडचे उदघाटन मंगळवार दि. 4 रोजी करण्यात आले.

या प्रायव्हेट कोविड हॉस्पिटलचे उदघाटन डॉ. डी.एस. थिटे, डॉ. दिपक पोफळे, डॉ. उदय मोरे, डॉ. बाबरे, डॉ. हराळय्या, डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.  

यावेळी डॉ. विजय पाटील, डॉ. उदय मोरे, डॉ. थिटे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. दिपक पोफळे, डॉ. हराळय्या, डॉ. पराग वाघमोडे, डॉ. अनिकेत इनामदार, डॉ. अभय शिंदे, डॉ. मल्लीकार्जुन खिचडे, डॉ. बाबरे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. सचिन शेंडगे, डॉ. सतिश नरवडे, डॉ. शितल बरबडे, डॉ. सुभाष वाघमोडे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.


डॉ. डी.एस.थिटे बोलताना म्हणाले की, उमरगा येथील रूग्णाचीं गरज पाहून लोकोपयोगी कार्य हाती घेवून चांगले केल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.  तद्नंतर डॉ. विजय पाटील बोलताना म्हणाले की, कोविड हॉस्पिटल एक डॉक्टरचे काम नाही, एकञ डॉक्टरांच्या समुहाने काम करीत चांगले कार्य हाती घेतले.यात सर्वजण यशस्वी व्हावेत असे म्हणाले. शेवटी डॉ. उदय मोरे बोलताना म्हणाले की, संपुर्ण उमरगा शहरातील डॉक्टर मंडळी आपणास सतत मार्गदर्शन करणार आहेत. सर्वच रूग्णांची सोय व्हावी, दररोज वाढते रूग्ण संख्या पाहता त्यांची सोय व्हावी व शासनाचे आदेशाचे पालन करीत रूग्णांची सेवा सुरू करीत असल्याचा मानस बोलून दाखवले.

यावेळी डॉ. उदय मोरे यांनी  पिपिई किट चे वाटप केले. या कोविड सेंटरच्या माध्यमातून शहरातील जवळपास 8 डॉक्टरांच्या समुहाने  हॉस्पिटलमध्ये कोरनाचे रूग्णाची मदत करण्याकरीता पुढाकार घेतलेले आहेत. सुञसंचालन डॉ. प्रशांत मोरे यांनी तर आभार डॉ. अनिकेत इनामदार यांनी मानले.

 
Top