अणदूर, दि. 02 : तुळजापूर तालुक्यातील अणदुर गावात कोरोना बाधितांची संख्या वरचेवर वाढत चालले असून ही बाब चिंताजनक आहे .रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नव्याने अठरा रुग्णांची भर पडल्याने अणदुर मध्ये कोरूना  बाधितांची संख्या 53 वर पोहोचले आहे. त्यामुळे अंणदुर गावे कोरणा हाँटस्पाँट होत  असल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

काल तुळजापूर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून कोरणा पॉझिटिव रुग्णांना घरीच काँरंटाईन होण्यास सांगू अणदुर ला पाठवल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने कोणत्या आधारे या रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे याचे उत्तर अजिबात मिळत नाही. या  मंडळीकडून कोरोना संदर्भात चुकीची माहिती देत जर घराबाहेर पडल्यास गावातील आणखी जास्त धोका निर्माण होणार असल्याचे तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे त्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी आढळलेल्या अठरा रुग्णांपैकी दहा पुरुष व आठ महिला रुग्णांचा समावेश आहे. 13 दिवसापूर्वी एकही रुग्ण नसलेल्या गावात आज 53 रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून हा वेग झपाट्याने वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे काहीही करून ही साखळी तोडली पाहिजे अशी जिद्द ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे त्यातच काही कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण प्रशासनाने होम काँरटाईन व्हावे म्हणून तुळजापूर डिस्चार्ज  केल्याने अणदुर आले ते जर बाहेर पडले तर गावाला खऱ्याअर्थाने धोका आणखीन वाढणार असून याबाबत प्रशासनाची चर्चा केली असता कोणतीही लक्षणे नसलेल्या आजार नसलेल्या पण कोरणा पॉझिटिव रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार व शासनाच्या नियम अटीत राहून घरी पाठवण्याचा निर्णय झाला असून त्या अनुषंगाने त्यांना सोडले असल्याचे सांगण्यात आले. 

परंतु ही मंडळी गुपचूप घरी राहतील का ? त्याचा संसर्ग कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला होणार नाही का ? त्यानंतर समाजाला व गावाला याचा संसर्ग होणार नाही का ? त्या रुग्णावर नियंत्रण कोणाचे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

गेल्या चार दिवसापासून गावातील सर्वपक्षीय प्रमुख मंडळी एकत्रित येऊन कोरोना साखळी तोडण्यासाठी व्यापक प्रमाणावर उपायोजना केल्या होत्या अगोदरच प्रशासनाला बरोबर घेऊन कोरोना बाधित रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्ट व्यक्तींना कोरनटाईन करणे त्याची लक्षणे बघून घेणे मोठ्या प्रमाणात होत होते. परंतु आरोग्य प्रशासन धडधाकट काही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव रुग्णांना होम काँँरनटाईन साठी सोडत असल्याने त्याचाही कामावर परिणाम झाला असून विलगीकरण कक्षात जागा नसल्याने यांना कोठे ठेवावी हा प्रश्न निर्माण झाला असून या घटनेचा त्यांच्या कामावर परिणाम दिसून येत आहे त्यामुळे  प्रशासनाने सोडलेल्या बाधित रुग्णांच्या बाबतीत ठोस निर्णय ग्रामपंचायतीने घ्यावे अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
 
Top