तामलवाडी  : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील पांगरधरवाडी येथे एका ७५ वर्षीय पुरूष कोरोनाची लागण झाल्याने संबधित परीसरत बंद करण्यात आला होता. परंतु दि.२ रोजी याच गावातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने येथील कोरोना रूग्णांची संख्या आता ४ झाली आहे.त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असुन या विषाणुचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणावर पसरताना दिसत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनोचा कहर सुरूच असुन तुळजापुर तालुक्यातील पांगरधरवाडी येथे तीन दिवसापूर्वी एका वयोवृद्ध पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कातील १५ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते व खबरदारीचा उपाय म्हणून संबधित परीसर बंद करण्यात आला होता.परंतु दि. २ रोजी गावातील १८ व १४ वर्षीय पुरूष व ६२ वर्षीय एका महीला अशा तीन जणांचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आला असल्याने  पांगरधरवाडी येथील कोरोना रूग्णांची संख्या वाढली असुन ती आता चारवर जाऊन पोहचली आहे.कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये परंतु मला काय होतयं या भ्रमातही न रहाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये,प्रत्येकांनी सामाजिक अंतर ठेवुन मास्कचा नेहमी वापर करावा असे आवाहन सरपंच विजय निंबाळकर यांनी जनतेला केले आहे.
 
Top