वागदरी : एस.के.गायकवाड

नळदुर्ग ता.तुळजापूर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथिल जि.प.कन्या प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब महाबोले यांची  उमरगा येथील गटशिक्षण कार्यालयात शिक्षण विस्तार आधिकारी म्हणून बढती करण्यात आली आहे. 

त्यांची  प्रथम नेमणूक दि.०९/०१/१९८४ रोजी ऊस्मानाबाद जि.प.अंतर्गत खानापूर ता.तुळजापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा येते झाली.आत्तापर्यन्त एकूण सर्वीस ३६ वर्ष ७ महीने झाली असून दरम्यानच्या काळात त्यांनी खानापूर, वागदरी, वसंत नगर, महालिंगरायवाडी, उमरगा (चि) ,पून्हा वागदरी नंतर जळकोट आदी गावात अत्यंत प्रमाणिकपणे निष्ठेने आनंदायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेलाआहे.आपल्या प्रदिर्घ सेवा कालात त्यांनी प्रौढशिक्षण व डीपी ईपी च्या माध्यमातून जिल्हाभर कलापथकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्यकेले आहे. शाळेमध्ये विविध उपकम घेऊन अनंदायी शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न  करित असलमुळे जेथे नोकरी असेल तेथे स्वभावामुळे पालक व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपलीओळख निर्माण केली आहे. वागदरी मध्ये त्यांनी सर्वाधिक सेवा केली आहे. वागदरी हे जणुत्यांचे माहेरघरच असा लळा निर्माण झाला आहे.आत्तापर्यत त्यांचे अनेक विद्यार्थी चांगल्या हुद्यावर कार्यरत आहेत वागदरी येथील एक विदयार्थी मुंबई येथे सी ए पदावर आहे. तर अनेक विद्यार्थी पोलीस, मिलेटरी ,शिक्षक ,सह विविध ठिकाणी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.    समाजात पालकासी मोठा   जनसंपर्क असल्याने ते एक विद्यार्थी व पालक प्रिय शिक्षक म्हणून सर्वत्र परीचीत आहेत. अधिकारी वर्गासी सहकार्याची भावना जोपासल्याने प्रशासनातही ते कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडीलही शिक्षकच होते .  बाळासाहेब महाबोले यांनी त्यांचा वारसा पूढे चालवत आपली कौटुंबिक जबाबदारी देखील ते तितक्याच जबाबदारीने पार पाडतात. त्यांची एक बहिण व भाऊजी वारल्याने अनाथ झालेली त्यांच्या दोन मुलांचा जन्मापासून त्यांनी सांभाळ केला. त्यांची तीन मुल आणि दिवंगत बहिणीची दोन मुलं असी एकूण पाच मुलं स्वतःचीच समजून घर चालवताना दिसतात .त्यांच्या या कार्यात त्यांची धर्म पत्नी सौ.मिराबाई महाबोले यांची मोठी सर्मथ साथ आहे. त्यामुळे ते आपल्या कार्याचे  अधिक श्रेय आपल्या धर्म पत्नीला देतात . त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन सन २००३ मध्ये त्याना शासनाच्या वतीने देण्यात येणारा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दि.०४/०८/२०२० रोजी सेवा जष्ठते नुसार गट शिक्षण कार्यालय उमरगा येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाल्या बद्दल त्यांचे विद्यार्थी, पालक व मित्रपरिवारामध्ये सर्वत्र आभिनंदन होत आहे.
 
Top