जळकोट : मेघराज किलजे

दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक, पत्रकारिता क्षेत्रातील भिष्माचार्य मुरलीधर शिंगोटे यांना जळकोट येथील श्री. गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय व जळकोट(बोरमन तांडा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुरलीधर शिंगोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्रातील मराठी व अन्य भाषिकांमध्ये वृत्तपत्रसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारे संस्थापक-संपादक मुरलिधर शिंगोटे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी व अन्य भाषिक वृत्तपत्र समूहांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशी भावना पत्रकार तथा श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे यांनी मुरलीधर शिंगोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त करून शिंगोटे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कृषी विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष अनिल करदुरे, सचिव राजशेखर माळगे, सहसचिव दत्तात्रय पांचाळ, संचालक विजयकुमार चव्हाण, नागनाथ बेळे, आंबेडकर सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top