लोहारा, दि. 06 : पंडीत दिनदयाल बिजली परियोजना अंतर्गत होळी ता. लोहारा येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के. व्ही. विद्युत वितरण उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच व्यंकट माळी, संजय मनाळे, राजेंद्र जाधव, प्रदीप दादा मोरे, विठ्ठल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, करण बाबळसुरे, पेठसांगवीचे सरपंच गणेश पाटील, रवींद्र मोरे, सास्तुर महावितरणचे कनिष्ठ अभियंता अंबिलकर, मुख्य लाईनमन अरुण कुंभार, होळीचे लाईनमन लक्ष्मण कांबळे, अक्षय गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी राम पाटोळे, हरीदास जमादार आदीजण उपस्थित होते.
गावातील वाढते घरगुती उद्योग व्यवसाय व विजेची मागणी लक्षात घेता भविष्यात या माध्यमातून एक मोठा प्रश्न सुटणार असल्याचे मत याप्रसंगी सरपंच व्यंकट माळी यांनी व्यक्त केले.

