लोहारा, दि. 06 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी सुनील साळुंके यांची तर उमरगा विधानसभा अध्यक्षपदी विजयकुमार लोमटे यांची निवड करण्यात आली आहे.

गुरुवार दि. 6 रोजी लोहारा तालुकाध्यक्ष पदी सुनील साळुंके यांची तर उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्षपदी विजयकुमार लोमटे यांची निवड करुन त्यांना ‍नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जिवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रतापसिंह पाटील, नितीन बागल आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top