वागदरी : एस.के.गायकवाड
इ.१०वी बोर्ड परिक्षेत तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील मुलींनी ९०% च्या वर अधिक गुणघेऊन घवघवीत यश संपादक करून गावची मान आणि शान उंचावली आहे.
वागदरी येथे जिल्हा परिषदेची इ.८वी पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना बाहेर गावी नळदुर्ग, अणदूर, शहापूर ,खुदावाडी आदी ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावे लागते. वागदरी येथील रहीवासी असलेल्या परंतु जवाहर विद्यालय अणदूर येथे इ.१०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या निकीता धरमराज सुरवसे यांनी ९७% ,राऊ हाणमंत वाघमारे यांनी ९३% ,तर राधिका चंद्रकांत वाघमारे यानी ९२% गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या आहेत.
त्यांनी मिळविलेल्या या यशा बद्दल ग्रामस्थातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.