नळदुर्ग, दि. ०३ :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीप (बापू) धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नळदुर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शानाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ति वाढण्यासाठी "आर्सेनिक अल्बम 30"या गोळ्याचे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष अलीम शेख़, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, भाऊराज कांबळे आदी उपस्थित होते.