तुळजापूर : कुमार नाईकवाडी
भाऊ-बहिणीचे प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, यंदा कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक गावांमध्ये असलेल्या पाहुण्यांच्या बंदीमुळे भावाबहिणीच्या भेटीवर सावट आले आहे. त्यामुळे हिंदु धर्मियाचा पविञ असलेला बहिन भावाचा रक्षाबधंन सण आणि श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी तुळजापुरात संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे रक्षाबंधन सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला.
सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी हिंदु धर्मियाचा पविञ असलेला रक्षाबधंन सण पारंपरिक पद्धतीने बहिणीनी आपल्या लाडक्या भाऊरायास घरोघरी राखी बांधुन, आपल्या भाऊरायास ओवाळुन दिर्घ आयुष्याची प्रार्थना केली. तसेच संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे ज्या बहिनी व भाऊरायास यांना बाहेर गावी जाता आले नाही. त्या बहिनीने वृक्षास राखी बांधुन तसेच सोशल मिडीयाच्या द्वारे आपल्या लाडक्या भावास रक्षाबधंनच्या शुभेछा दिल्या.
दरवर्षी रक्षाबधंन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माञ यावर्षी कोरोनामुळे काही बहिणींना आपल्या लाडक्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधता आली नाही. त्यामुळे या रक्षाबधंन सणावर कोरोनाचे सावट दिसुन आले .एरवी दरवर्षी रक्षाबधंन सणाला शहरात मोठी गर्दी असते. माञ यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने सोमवारी शहरातील बाजार पेठा ओस पडल्या होत्या. तसेच कोरोना साथी च्या रोगाचा वाढता पादुर्भाव लक्षात प्रशासनाने तालुक्याती श्री महादेव मंदीरात जाण्यास मनाई केल्याने श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारी तालुक्यातील सिंदफळ मुधग्लेश्वर, बारालिंग मंदीर आदीसह श्री महादेवाचे मंदीर बंद होते. त्यामुळे अनेक शिव भक्तांनी घरीच श्री महादेवाची पुजा केली.