तुळजापूर : पुण्यश्लोक‍ अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तुळजापूर तालुका धनगर संघटनेच्यावतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी रक्ताने निवेदन लिहून तुळजापूर तहसिलदार यांना गुरुवार रोजी देण्यात आले.

धनगर समाज एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा, धनगर समाजासाठी एक हजार कोटी मंजूर करुन बावीस योजना राबवाव्यात, मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबवा, यासह इतर मागण्यासाठी रक्तलिखित निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रमोद दाणे व राजाभाऊ शेंडगे यांनी रक्ताने लिहलेले अक्षर व स्वाक्षरी आहे.


 
Top