उमरगा  : पंधरा ऑगस्ट निमित्त उमरगा शहरात काही ठिकाणी तिरंगा असलेले मास्क तयार करून ते विक्री करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर हा मास्क नसून भारत देशाचा तिरंगा झेंडा आहे. हा मास्क कोणीही वापरू नये, विकत घेऊ नये, असे आवाहन छावा क्रातीवीर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

त्याचप्रमाणे याबाबत छावा क्रातीवीर सेनेचे उमरगा व्यापारी महासंघ यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती छावा क्रातीकारी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. हे असे मास्क कोणीही वापरू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

ज्या तिरंग्यासाठी आज भारताच्या सीमेवर आपले जवान आपले प्राण देत आहेत आणि याच तिरंग्याचे मास्क बनवणे म्हणजे लज्जास्पद आहे. यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे उमरगा तालुका अध्यक्ष विष्णु भोसले, शहरध्यक्ष  सुमित घोटाळे, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष अमोल पाटील,आय टी  सेलचे जिल्हा अध्यक्ष शैलश लोखंडे , तालुका संघटक जालिंदर भोसले, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते..

 
Top