तुळजापूर : कुमार नाईकवाडी
जळकोट ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) युवा आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे याना जातिवाचक भाषा वापरून जिवंत जाळून ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून सदर प्रकरणातील आरोपीस त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
तुळजापूर तहसीलदार यांना दि. १३ रोजी रिपाइंच्या वतीने दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष शुभम कदम, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तुळजापूर शहर अध्यक्ष अरूण कदम, मरगु शिंदे, दशरथ गायकवाड, परमेश्वर वाघमारे सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.