उस्मानाबाद, दि. 12 : जिल्हयात गुरुवार दि. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी आलेल्या प्राप्त अहवालानुसार 155 जण कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहे. तर तब्बल 20 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या 94 झाली आहे. आता जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 48 पोहचली आहे. यापैकी 1 हजार 550 जण बरे होऊन घरी परतले असून 1 हजार 404 जणांवर उपचार सुरु आहे. मृत्यू झालेल्या वीस जणांपैकी 13 जण हे मागील काही दिवसांत इतर जिल्हयात उपचार दरम्यान मृत्यू झालेले असून ते पोर्टलच्या आधारे घेण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.
आज पॉजिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 39, तुळजापूर 11, उमरगा 21, कळंब 17, परंडा 29, लोहारा 13, भूम 24, वाशी तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद येथे एकूण 332 स्वब पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तसेच जिल्हयातील रॅपिड अॅटिजेन चाचणीचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.