परंडा : अंगद बलभिम शिंदे, रा. लोणी, ता. परंडा यांच्या राहत्या घरात्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 01.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील 64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किं.अं. 1,60,000/-रु.) चे चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या अंगद शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.08.2020 रोजी नोंदवला आहे.
आंबी : गोकुळ ईटकुर व त्याच्या सोबत असलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी दि. 01.08.2020 रोजी 15.00 वा. सु. भुम तालुक्यातील मौजे आलेश्वर शिवारात असणाऱ्या कब्रस्थानातील चंदनाचे झाड (किं.अं. 5,000/-रु.) मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 7223 वरुन चोरुन नेन्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या हनीफ उस्मान मुलानी, रा. आलेश्वर यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 379, 511, 427 अन्वये गुन्हा दि. 01.08.2020 रोजी नोंदवला आहे.
आंबी : तात्यासाहेब उध्दव चोबे, रा. आनाळा, ता. परंडा यांनी त्यांची हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 12 एचके 9187 ही दि. 21.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती दि. 01.08.2020 रोजी जागेवर आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या तात्यासाहेब चोबे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 01.08.2020 रोजी नोंदवला आहे.
परंडा : धन्यकुमार मधुकर अंधारे, रा. भांडगाव, ता. परंडा यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 ए 7543 ही दि. 01.08.2020 रोजी मौजे भांडगाव येथील आपल्या शेतात लावली असता ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धन्यकुमार अंधारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.08.2020 रोजी नोंदवला आहे.