लोहारा, दि. 05 : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालेगाव ता. लोहारा येथे ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील सर्व कुटूंबास अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळया व सॅनिटायझरचे बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी वाटप करुन ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित अंतर ठेवावा, मास्कचा वापर करावा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये, सर्दी, ताप, खोकला, यासह अन्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, जेष्ठ नागरिक व लहान बालकांनी घरातच थांबावे, यासह आदी बाबत मान्यवरांनी आवाहन केले.
सरपंच नारायण गुरव, मुरलीधर पाटील, ग्रामसेवक भोरे एन.बी, ग्रामपंचायत सदस्य प्रविण गोरे, भास्कर बिराजदार, उलनदेवी गरड, धोंडाबाई बाबर, रुक्मीणबाई भांगे, रेखा भालेराव, डॉ. संदीप बनसोडे, आरोग्य पारिचारीका कोमल भालेराव, आरोग्य सेवक गणेश लुलै, मंगल कांबळे यांच्या हस्ते सॅनिटायझर, व असैर्निक अल्बम ३० गोळ्याचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
सालेगांव ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य उपकेंद्र सालेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने गावात मोफत आरोग्य तपासणी राबविण्यात येणार असून यामध्ये पल्सरेट, ऑक्सिजन लेव्हल, बॉडी टेंपरेचर लेवल चेक करणे यासह आदी आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. याप्रसंगी कमलाकर बिराजदार, गणपत साळुंके, बबन बाबर, मधुकर साळुंके, अतुल गोरे, परमेश्वर भालेराव, रत्नदीप बडुरे, कमलाकर देशपांडे, अमोल कांबळे, रंजना भालेराव, मंगल गोरे, सुवर्णा मातोळे, स्मिता भालेराव, लता साळुंके, भीमराव भालेराव, बालाजी चव्हाण, तानाजी जाधव, कोमल मसलगे, आदीजण उपस्थित होते.