जळकोट, दि. ५ : मेघराज किलजे

अयोध्या येथील श्रीराम प्रभू चंद्राच्या मंदिर बांधकामाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधकाम भुमिपुजन वेळी जळकोट(ता.तुळजापूर) येथील ग्रामीण तीर्थक्षेत्र श्री. केदारलिंग मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू रामचंद्र की जय.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन होत असताना त्याच वेळी श्री. केदारलिंग मंदिरात पूजा अर्चा करून श्री. सिद्धेश्वर कट्टी मठ संस्थांनचे मठाधिपती १०८श्री.श्री.श्री.ष. ब्र. शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव करण्यात आला. संपूर्ण मंदिर दिवाणी उजळून निघाले होते. श्रीराम व स्वस्तिक दीपोत्सवात साकारण्यात आला. प्रभू श्री रामचंद्र की जय... जय श्रीराम... अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

या दीपोत्सवात श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय तथा पत्रकार मेघराज किलजे, विजय पिसे, बबलू किलजे, सदाशिव हासुरे, तम्मा कुंभार, सुरज अंगुले, प्रवीण नरुणे, प्रतीक किलजे, अविनाश छत्रे, संजय कडते, कुंभार, हासुरे आदी जण सहभागी झाले होते. यावेळी प्रतीक किलजे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते सत्कार करून आला.
 
Top