काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.(5) रोजी अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाच्या पार्श्र्वभूमीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम मंदीराच्या भूमिपूजनाच्या पार्श्र्वभूमीवर येथील श्री विठ्ठल भजनी मंडळातर्फे अयोध्येतील राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून मंदीरासमोर श्रीरामाच्या जयघोषात भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मनोहर कदम, हभप सुनिल ढगे महाराज, शिवाजी चिवरे, देविदास ढगे, सुर्याजी चिवरे, हरि ढगे,अनंत चिवरे, शिवाजी राऊत, सुधाकर चवळे आदीसह विठ्ठल भजनी मंडळातील सदस्य उपस्थित होते.