नळदुर्ग : सचिन गायकवाड

कोरोना रोगाचा ग्रामीण भागात शिरकाव होत असून तालुक्यातील चिकुंद्रा येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील रुग्ण तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.

सदरील रुग्ण हा गेल्या सात ते आठ दिवसापासून उपचार घेत होता. दि.१० रोजी सदर व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्या अनुषंगाने चिकुंद्रा येथे खबरदारीची बाब म्हणून नळदुर्ग येथील वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत कोरूना पॉझिटिव्ह आलेला परिसर सील करण्यात आला असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिवारातील व्यक्तींना नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. 

चिकुंद्रा येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे चिकुंद्रा ग्रामपंचायत व प्रशासनातर्फे दि.११ पासून तीन दिवसाचा जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचे सर्व नागरिकाने पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विनाकारण गर्दी केल्यास किंवा विनाकारण घराबाहेर पडल्यास अथवा गावातील दुकान उघडल्यास ग्रामपंचायत कार्यालयातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.  अशा सूचना चिकुंद्रा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहेत 


 
Top