मुरुम, दि. ७ : उमरगा तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरूच असून मुरुम शहरात एकूण रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. गुरुवार (दि. ६) रोजी मुरूम ग्रामीण रुग्णालय येथे १९ व्यक्तीचे रॅपिड टेस्ट करण्यात येवून यामध्ये एक पोलीस कर्मचारी व एक तडवळ (कर्नाटक) येथील व्यक्ती पॉझिटिव्ह व त्या व्यतिरिक्त पाठवण्यात आलेल्या स्वॅब टेस्ट मधून सहा व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यात एकाच कुटुंबातील ०५ व्यक्तींचा समावेश असून ते आदींच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
सध्या ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये ३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दहा ऑगस्ट पर्यंत शहरात संचारबंदी लागू केली असून त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने प्रशासन पण हतबल झाले आहे. शुक्रवारी (ता.७) रोजी स्थानिक व्यापाऱ्यांनी शहरातील फक्त किनारा दुकाने बंद ठेवली आहेत.
