मुरूम, दि. ७ : कन्या प्रशालेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक गुरय्या बसय्या स्वामी यांचे निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. मनमिळावू आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीना धावून जाणारे शिक्षक असा त्यांचा लौकिक होता. मुळचे मुरूम  येथील असणाऱ्या गुरय्या स्वामी यांनी बार्शीला आपली कर्मभूमी मानली. त्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार येथे निर्माण झाला होता. कन्या प्रशाला ते मॉडर्न हायस्कुल, बार्शी असा त्यांचा प्रदीर्घ काळ कार्यरत झाला. 

विद्यार्थी हिताचा वसा घेतलेले शिक्षक असे त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावाई असा परिवार आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी प्रसंगी पदरमोड केली. त्यामुळे गोर-गरीब विद्यार्थ्यांचे तारणहार अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनाने मुरुम शहर आणि परिसरात शोक व्यक्त होत आहे.

 
Top