तुळजापुर : कुमार नाईकवाडी
राज्याचे महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांना श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर सुरु करण्याबाबत व इतर मागण्यांचे निवेदन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत दिले.
माजी मंत्री चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या पाच माहिन्यापासुन श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर बंद असल्यामुळे येथील व्यापारी वर्गाचे व पुजारी बांधवाचे मोठे हाल होत आहेत. यामुळे आर्थिक व्यवहाराचा मोठा फटका बसला आहे. व्यापारी व पुजारी वर्गाना श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानकडुन जिवनाश्यक वस्तुचे किराणा किट देण्यात यावे. त्याचबरोबर सामाजिक अंतराचे नियम पाळुन श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे त्याच्यावर नियञंण ठेवण्यासाठी शासन स्तरावरुन मोठे प्रयत्न करावेत, असे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी वैद्यकिय शिक्षण मंञी अमित देशमुख, महिला बालविकास मंञी यशोमती ठाकुर, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, सुनील चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲङ. धिरज पाटील, तालुकाध्यक्ष अमर मगर, नगरसेवक रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, लखन पेंदे आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
