वागदरी : एस. के. गायकवाड
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या लातुर विभागीय अध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्हयातील येडशी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डी.डी.मस्के यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परीषद ही महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र या विषय शिक्षकांची परिषद असून राज्यशास्त्र या विषयातील विविध संकल्पना, विचारप्रवाह, आंतरराष्ट्रीय कायदा व संबंध, राजकीय पक्षाचा विकास व वाटचाल अशा वैविध्यपूर्ण बाबीवर चर्चा व विचारविनीमय करण्यासाठी या परिषदेची निर्मिती केली आहे.
या परिषदेचे राज्याध्यक्ष अमरावतीचे प्रा. सुमीत पवार, सचीव भंडाऱ्याचे प्रा. पितांबर उरकुडे, कार्याध्यक्ष धुळ्याचे प्रा. भगवान चौधरी, उपाध्यक्ष चंद्रपूरचे प्रा. शरद जोशी व नाशिकचे प्रा. सुरेश नारायणे, सहसचीव लातूरचे प्रा. सुनील राठोड आणि कोषाध्यक्ष प्रा. श्रीमती स्मिता जयकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्याच नेतृत्वाखाली विभागीय स्तरावर या परिषदेच्या नऊ विभागीय शाखा निर्माण केल्या आहेत. त्यापैकी लातूर विभागीय राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचे अध्यक्ष म्हणून येडशी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डी.डी.मस्के यांची निवड करण्यात आली.
बाकी उरवरित लातूर विभागीय कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.
उपाध्यक्ष दयानंद महाविद्यालय लातूरचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी,देवणीचे प्रा. कन्हैयालाल धांदू,उस्मानाबादचे प्रा. राहूल पाटील व नांदेडचे प्रा.एकनाथ मिरकूटे आदींची निवड करण्यात आली आहे. तर महासचीव म्हणून उदगीरचे प्रा. बालाजी बिरादार यांची निवड केली. असून सचीव म्हणून धर्माबादचे प्रा. बालाजी श्रीगीरे,लातूरचे प्रा. तानाजी भोसले,व परांड्याचे प्रा. महादेव मारकड यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून नांदेडचे प्रा. एस जी कौसल्ये यांची निवड केली आहे.
विभागीय महिला प्रमुख नांदेडच्या प्रा.डाॅ. लक्ष्मी पूरणशेट्टीवार, व लातूरच्या प्रा. शितल पारवे , कळंबच्या प्रा. श्रीमती अरूणा देशमुख यांची निवड केली गेली आहे.
कार्यालय प्रमुख म्हणून उस्मानाबादचे प्रा.राजकुमार जाधव व सहप्रमूख औश्याचे प्रा. पठाण जहागीर तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून लातूरचे प्रकाश करमूडे व सहप्रमूख उमरीचे प्रा. नामदेव मोरे. सोशल मिडीया प्रमुख म्हणून लोह्याचे प्रा. विष्णूदास केंद्रे व सहप्रमूख लोहाऱ्याचे प्रा. आर.डी.निकम यांची निवड केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातून विभागीय कार्यकारिणी सदस्य म्हणून तुळजापूरचे प्रा. सुरेश कोकाटे, परंड्याचे प्रा. धोंडीराम दुधे,कळंबचे प्रा. गोविंद फेरे,उमरग्याचे प्रा. दिलीप वाघमारे, कळंबच्या प्रा. श्रीमती शितल शिंदे व परांड्याच्या प्रा. श्रीमती अनिता पैठणपगार आदींची निवड करण्यात आली आहे.सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मित्रपरिवारातून आभिनंदन होत आहे.
