उमरगा, दि. 13 : शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भजन व किर्तनास परवानगी द्या, अशी राष्ट्रीय वारकरी परीषद संघटनेच्यावतीने उमरगा तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक भक्तांचे नित्य नियम आहेत. शासनाने नियम, अटी लावून मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर भजन व कीर्तन याला सुद्धा परवानगी मिळावी. महाराष्ट्रात अगदी दारूच्या दुकानांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. मग मंदिरातील दर्शनास का नाही असा प्रश्न महाराष्ट्रातील संबंध वारकऱ्यांच्या मनात आहे. या काळामध्ये अनेकांना या संकटांमध्ये नैराश्य आलेला आहे. या नैराश्याला दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायातील भजन कीर्तन या माध्यामातुन नैराश्याला तोंड देता येते. 

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कीर्तन भजने करण्यास कटिबद्ध आहेत. तात्काळ  कीर्तन व भजन तसेच मंदिरातील दर्शनास व मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.विरनाथ महाराज काळे, उमरगा तालुका सचिव ह.भ.प. कुलदीप महाराज मळगीकर, दयानंद महाराज माने आदीजण उपस्थित होते.


 
Top