विद्यार्थ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस शाळा व महाविदयालयांना भेट देवुन महाराष्ट्र शासनाने सुचित केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची फी वाढ करु नये व शक्य असेल तेवढा शैक्षणिक शुल्क कमी करावा, तसेच टप्प्याटप्प्याने  भरण्यास सवलत द्यावी, यासाठी शाळा महाविद्यालय व कोंचीग क्लासेस यांना भेट देऊन आवाहन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दुर्गश सांळुके यांनी सांगितले आहे. 

तुळजापूर, दि. 13 : शैक्षणिक संस्था पालकांकडून जास्तीचे शैक्षणिक शुल्क जबरदस्तीने घेत असल्याचे आढळून येत असून काही ठिकाणी शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर ल्ह्यात कोविड शुल्कनिती अभियान राबविणार असल्याचे राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गश सांळुके यांनी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,.

संसर्गजन्य कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आल्याने महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. सदय परिस्थितीत पालकांची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली आहे. ब-यापैकी कामकाज कमी झाले असून महाविद्यालय-शाळा सध्या बंद आहेत. परिणामी शाळा-महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी काही ठिकाणी ऑनलाईन वर्ग चालू केले आहेत. मात्र काही संस्था चालक विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावत असल्याचे समजते. तर जास्तीची शैक्षणिक शुल्क आकारात असल्याचे आढळून आले आहे. तरी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेवून विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत देवून सदर फी ही तीन ते चार टप्प्यामध्ये घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण, राकेश पुजारी, विजय पाटील, संकर्ष देशमुख, ओंकार अपराध, प्रज्वल अंगुले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top