तुळजापूर, दि. 13 : कुमार नाईकवाडी

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुळजापूर संस्कारभारती ने आयोजित केलेल्या  "कृष्णरूप सज्जा"  या  स्पर्धेमध्ये मोठ्या गटामधून मिताली अमित हुंडेकरी  व लहान गटामधून  विआन  विजयकुमार गंगणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजेत्यांचे अध्यक्ष पद्माकर मोकाशे व संयोजक मयुर शेटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अ गट  १ ते ४ वयोगटात मधील स्पर्धेमधून प्रथम विआन विजयकुमार गंगणे, द्वितीय- भार्गव सुनील जोशी, तृतीय - पृथ्वीराज संपत भोसले, तर उत्तेजनार्थ प्रथम स्वराज गणेश देशमुख, द्वितीय -दर्शन दिपक कुंभार,  तृतीय-  शिवांश सिद्धांत लवंद आणि पाच ते आठ वर्षे वयोगटातील च्या ब गटामधून प्रथम-  मिताली अमित हुंडेकरी, द्वितीय-  स्वराली शिवराज लोंढे, तृतीय- वेदांत सचिन जमदाडे, उत्तेजनार्थ प्रथम- श्रेयश विश्वास डोईफोडे द्वितीय-आराध्या हर्षद कांबळे, तृतीय-वरद शीतलकुमार अमृतराव यांनी या दोन्ही गटांमध्ये उत्तम सादरीकरण करून पारितोषक मिळवले आहे. 

कोरोना संकट लक्षात घेऊन सदर स्पर्धा व्हाट्सअप ग्रुप वरून घेण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक मयूर शेटे, सुधीर महामुनी, नाट्यकलावंत स्वप्नील भोसले, संघटनमंत्री संतोष डोईफोडे, लक्ष्मीकांत सुलाखे, राजू भोरे, ओंकार लसणे, कु सुप्रिया कावरे, डॉ. सतीश महामुनी यांनी परिश्रम घेतले.


 
Top