जळकोट, दि. १३ : मेघराज किलजे

आज संपूर्ण जगाला लागलेल्या कोविड -१९ सारख्या भीषण महामारी परिस्थितीत  लाखो लोक मुत्युमुखी पडले असुन आपल्या राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यातील गावोगावी आज कोरोना पसरलेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेला लॉकडाऊनच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने अन्नदान,  किराणा उपयोगी महत्त्वाच्या वस्तू सर्व सामान्य जनतेला या    राज्यातील  सामाजिक संस्थेचे (एन.जी.ओ)  पदाधिकारी यांनी संस्थेच्या माध्यमातून आपल्या जिवाची पर्वा न करता राज्यातील जनतेची सेवा केली जात असून  त्यांची भूमिका महत्वाची असल्याची  प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिपक आगळे- पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

दीपक आगळे यांनी सांगितले की ,काहीतरी सर्व सामान्य जेनतेच काही देणं लागले या उद्देशाने आज राज्यातील सर्व संस्था कोविड- १९ सारख्या परिस्थितीत आपली सेवा करीत आहेत. म्हणुन केद्रं सरकार व राज्य सरकार यांनी खरोखरच सर्व सामाजिक संस्था व संस्थेचे पदाधिकारी यांचा सन्मान करावा, त्याच प्रमाणे सामाजिक संस्था हि सरकार व जनता यांच्यातील महत्वाचा दुवा असुन देशाला या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी व जनतेच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार पुर्ण ती मदत करत असुन व एन.जी.ओ.  महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते दिपक आगळे- पाटील यांनी सांगितले.

 
Top