उस्मानाबाद, दि. 16 : जिल्हयात 1 हजार 384 जणांची रॅपिड अँटिजेन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 64 जणांचा अहवाल रविवार दि. 16 रोजी पॉजिटीव्ह आला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 81 जण बरे होवून घरी परतले आहेत. जिल्हयात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 478 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 731 जण बरे झाले असून 1 हजार 649 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण सारोळा बुद्रुक ता. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहे.
रविवारी आढळलेल्या 64 रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 19, तुळजापूर 7, उमरगा 3, कळंब 12, परंडा 13, लोहारा 1, भूम 8, वाशी 1 जणांचा समोवश आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली 1, बेंबळी 1, केकस्तळवाडी 3, राजुरी 1, वडगाव सिध्देश्वर 1, उस्मानाबाद शहरातील रामनगर 4, शाहूनगर 1, आनंदनगर 2, तांबरी विभाग 1, ओमनगर 1, समतानगर 1, वैराग रोड 1, बार्शी रोड 1, विजयनगर 1, तुळजापूर शहरातील मार्केट यार्ड 2, तालुक्यातील येवती 1, नळदुर्ग 4, उमरगा शहरातील 3, कळंब शहरातील इस्लामपुरा 1, दत्तनगर 1, कल्पनानगर 1 तर कळंब तालुक्यातील डिकसळ 1, वाघोली 8, परंडा शहरातील मुजावर गल्ली 1, मंगळवार पेठ 2, कुर्डूवाडी रोड 1, करमाळा रोड 2, खास्तापुरी रोड 1, बसस्टँड जवळ 1, तालुक्यातील शेलगाव 1, पिस्तमवाडी 3, डोंजा 2, लोहारा तालुक्यातील सास्तुर 1, भुम शहरातील कोष्टी गल्ली 2, भगवान गल्ली 2, शेंडगे गल्ली 4, वाशी शहरातील 1 असे एकूण 64 रुग्ण आढळले आहेत.