उस्मानाबाद, दि. 16 : शहरातील रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद तर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जनजागृती अभियानाचा प्रारंभ शनिवार दि 15 ऑगष्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आला. ही जनजागृती करण्यासाठी चार चाकी वाहनावर बॅनर लावून तसेच त्यावर कोरोना महामारीसी लढा देण्यासाठी प्रत्येकाने आपली रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी घरगुती उपाययोजना काय कराव्यात तसेच कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्धलची माहिती दिली जाणार आहे.उस्मानाबाद शहरात तसेच तालुक्यात ही जनजागृती स्पीकर वरून नागरीकांना जाहिर आवाहन करण्यात येणार आहे.

याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख,सचिव इंद्रजित आखाडे,सुधाकर भोसले,सुरज कदम,धनंजय वाकुरे,नितीन तावडे, नवनाथ ढगे, बाबासाहेब साळुंके आदी  मान्यवर उपस्थित होते.रोटरी क्लबचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानून ही जनजागृती तालुक्यातील खेड्यापाड्यात केली जाणार असल्याचे सांगितले.


 
Top